सोमवार, २५ डिसेंबर, २०२३
आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची व्हॅली..
सांधण व्हॅली नाईट ट्रेक⛰⛰
3000 फूट उंचीची दरीत जाऊन बेस कॅम्पिंग..⛺⛺
या ट्रेक बद्दल जेव्हढे बोलावे तेव्हढे शब्द अपूर्णच ..या ट्रेकिंगचा अनुभव अविस्मरणीय अन अतुलनीय आहे.. माझे स्टेटस पाहून जेंव्हा माझे मित्र, मैत्रिणी परिवार,नातेवाईक,सहकारी, शेजारी ज्यांनी पाहिले त्यांना प्रत्येकाला उत्सुकता लागली होती..कोठे आहे ही व्हॅली ??
खरोखरच ट्रेकिंग केल्याने खूप मोठी ऊर्जा मिळते, आत्मविश्वास वाढतो,भीती जाते, मला कधीच वाटले नाही की मी एवढा मोठ ट्रेकिंग करू शकेल..आम्ही जेव्हा सर्व ग्रुप जेवण करून सांधण व्हॅली तून दुपार नंतर 3 वाजता सुरुवात केली.. अन तेंव्हाच गुढघा ने इशारा दिला शक्य नाही.. गुढघा दुखायला सुरवात झाली.. पण मी मात्र ठरवले पक्के की काही झाले तरी ग्रुप सोबत आपल्याला चालत राहायचे न थांबता.. माझ्या मनाने निश्चय केला अन शरीराने ही साथ द्यायचे ठरवले होते .की कोणत्याही परिस्थितीत ट्रेक पूर्ण करायचा प्रयत्न करीत मी दीर्घ श्वास घेतला.. *चलो निकल पडो*🏃♀️🏃♀️🏃♀️
हा ट्रेक पूर्ण अन प्रचंड ऊर्जेने करायचा आहे..बस्स मग ग्रुप सोबत चालत राहिली.. मला माहित नाही माझ्या वयातील महिला ट्रेकिंगला जाता की नाही पण मी आमच्या ग्रुप मध्ये सर्वात मोठी वयाने सर्व पोरं 20 -25. वयातील मी मात्र 40 शी ओलांडलेले.. निर्धार पक्का होता की आपण करू शकतो..⛰⛰
*विकलांग अरुणीमा सिन्हा*
तिने लिहिलेलं पुस्तक वाचले आहे.अन तेंव्हा पासून ठरवले होते की आपणही ट्रेकिंग करायचे...ती हिमालय सारखे उंच शिखर ट्रेक करते तर आपण तर दोन्ही पायाने चांगले आहोत...तसे मला देखील स्वतःला ही फार आवडते निसर्गाच्या सानिध्यात वावरायला..निसर्ग हा माणसापेक्षा नक्कीच प्रामाणिक ,आल्हाददायक आनंद देतो.. माणस स्वार्थी असतात...तसा निसर्ग निःस्वार्थ आपल्याला परमोच्च आनंद देतो..फक्त आपण त्याच्या सहवासात येणे आवश्यक असते..त्या बरोबर आपण निसर्गाचे संवर्धन केले पाहीजे..
⛰⛰ रॅपलिंग चा आनंद काय वेगळाच.. आमच्या सोबत असलेला नामदेव त्याच्याकडे असलेले रॅपलिंग किट त्यांनी आम्हाला दिले. उंच डोंगरावरून आम्ही कमरेला वेढा घातला दोरीचा,पॅक केले अन् एक एक जण खली उतरू लागले.अंधार वाढच होते.याअंधारात दरीतून रान किड्यांचा आवाज कानांना एकांतात अतिशय सुंदर अनुभव देत होता, एवढ्या मोठे मोठे दगड त्या दगडांना आम्ही रॅपलिंग करून खाली उतरत होतो. आम्ही एकेक जणांमध्ये पंधरा फुटाचे अंतराने सर्व दहा जण सुरक्षित खाली उतरलो. अशा प्रकारच्या तीन वेळेस आम्ही खडकाच्या दगडांच्या मोठमोठ्या खिंड कपाऱ्यातून अंधारात खाली गेलो. कड्या कपारातून जातांना मनात अजिबात भीती नव्हती काय अम्हा सर्वांची सकारात्मक ऊर्जा एव्हढी होती.. की बस्स फक्त आनंद घेत होतो.. आलेल्या प्रत्येक क्षणाला प्रचंड उत्स्फूर्तपणे ऊर्जा जमा करत होतो.. मनातल्या मनात विचार येत होता तो म्हणजे या ऊर्जेचे प्रेरणा निसर्ग....👍🏼
⛺⛺बेस कॅम्प ला 3000 फुट दरीतून जाऊन मध्य रात्री उशिरापर्यंत.. जेवून झरा जवळ खडकावर वामकुक्षी चा आनंद घेतला..अप्रतिम आहेत असे विलक्षण क्षण...मग ते क्षण थांबावेत असे वाटत होते.. पण ते क्षण चुटकीसरशी निसटत होते.. आनंद मनातून ओसंडून वाहत होता...
पहाटे 5 वाजता परतीच्या प्रवासाला निघालो.. करवली घाटातून वरती येण्यासाठी पहाटेच अंधारातुन मनाची तयारी करून अन सोबत प्रचंड ऊर्जा घेऊन अंधार वाटेतून रस्ता शोधत आमचा शिरर्पा(नामदेव) ला घेऊन..अजिबात कंटाळा न करता मोठया ऊर्जेने मौज मजा करत...शिटी वाजत आरडा ओरडा करत...
जंगलातून,काट्या कुपाट्यातून, मोठे मोठे दगडात तुन..मोठया खडकावर रस्ता शोधत, वाट चुकलो तर अशी भिती मनात घेऊन नामदेव मार्गदर्शक त्याच्या मागे पावलावर पाऊल टाकत.. मोठया उल्हासाने आमची ट्रेकिंग मिशन यशस्वीपणे पूर्ण करून...जल्लोष करत वरती पोहचलो.
सकाळी सकाळी 9 वाजता...पोहचलो अल्पोपहार घेऊन पुन्हां घाटघर धरणातील पाण्यात राहिलेला उर्वरित आनंद पाण्यात पेडी केअर करत, पोहत आम्ही सर्व ग्रुप ने आनंद घेतला..जेवून आम्ही निघालो घराकडे आपापल्या..
सांधण व्हॅलीचा नाईट ट्रेक माझा अविस्मरणीय अनुभव.⛺⛺
श्रीमती भारती ठाकरे
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची व्हॅली..
सांधण व्हॅली नाईट ट्रेक⛰⛰ 3000 फूट उंचीची दरीत जाऊन बेस कॅम्पिंग..⛺⛺ या ट्रेक बद्दल जेव्हढे बोलावे तेव्हढे शब्द अपूर्णच ..या ट्रेकिंगचा ...
-
सांधण व्हॅली नाईट ट्रेक⛰⛰ 3000 फूट उंचीची दरीत जाऊन बेस कॅम्पिंग..⛺⛺ या ट्रेक बद्दल जेव्हढे बोलावे तेव्हढे शब्द अपूर्णच ..या ट्रेकिंगचा ...
-
आदिवासी वारली चित्रकला संवर्धन-जतन "भित्तिचित्रे" उपक्रम- शैक्षणिक वर्ष -2018/19 आम्ही उन्हाळी उपक्रम राबविले.. त्यात वारली कले...