बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

वारली संवर्धन - जतन माझ्या शाळेचा उपक्रम..

आदिवासी वारली चित्रकला संवर्धन-जतन "भित्तिचित्रे" उपक्रम-  शैक्षणिक वर्ष -2018/19 आम्ही उन्हाळी उपक्रम राबविले.. त्यात वारली कलेचा परिचय व्हावा आणि  विद्यार्थ्यांना चिरकाल ओळख रहावी.. त्यासाठी वारली चे जनक त्यांच्या बद्दल माहिती उपलब्ध करून घेतली अन विद्यार्थ्यांन पर्यंत पोहचवली..   मी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रोजच्या माध्यन्ह भोजन झाल्यानंतर राहिलेल्या वेळेत त्यांना मी वारली चे धडे गिरवायला शिकवत.त्यांच्या कडून करून घेत असा खूप सराव करत..विद्यार्थ्यांना आनंद मिळू लागला..याचा उपयोग चांगला व्हावा या प्रयत्नात मी होते..  अचानक कल्पना सुचली की आपण वर्गाच्या बाहेरील भिंतीवर वारली करावे..खूपच खराब भिंती त्यावर चिखलाचे धब्बे, काही रेघोट्या अशा भिंती जर आपण बोलक्या केल्या तर विद्यार्थी ते न्याहळतील त्यांना परिचय होईल अशा हेतूने मी विद्यार्थ्यांना घेऊन याबाबत मुख्याध्यापकांना बोलले अन त्यांची परवानगी घेतली...सुरवात केली
वारली जनक त्यांच्या बद्दल थोडे महत्वाची माहिती-
अनादी काळापासून निसर्ग आणि जीवन मूल्य सोबत आपल्या संस्कृतीक, पारंपरिक ,बौद्धिक संपदा असलेल्या आदिवासी समाजा कडे आज जग पर्यावरण आणि जैवविविधता इत्यादी साठी आदिवासी पारंपरिक ज्ञानाकडे आशेने बघत आहेत. नवीन पिढी ची नाळ आपल्या मूल्यांशी मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे."सांस्कृतिक ओळख सोबत आपली स्वावलंबी अर्थव्यवस्था आणि स्वावलंबन टिकवण्यासाठी जल जंगल जमीन जतन करून कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती चे उपक्रम साठी सकारात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया..जंगलात कडीकपारीत लपलेली वारली चित्रकला जगाच्या नकाशावर नेणारे *वारली चित्रकार पद्यमश्री जिव्या सोमा म्हसे* यांना वारली चित्रकलेचे जनक समजले जाते...
वारली चित्रकला    अशा या जगप्रसिद्ध चित्रशैली ची ओळख पुढच्या पिढीला रहावी त्याच प्रयत्नात माझा खारीचा वाटा म्हणून... वारली भित्तीचित्रकला कशी केली जाते..त्यातील ग्रामीण जिवनातील दैनंदिन विषयावरील रेखाटनत प्रसंग कसे दाखवावे असे सतत प्रयत्न केले जातात.. अशी कल्पना सुचली आणि आम्ही कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला..परीक्षा आटोपून विदयार्थ्यांना सोबत घेऊन वारली धडे गिरवून, त्यांचा सराव करून घेतला आणि मग सुटी तील उपक्रमचा आरंभ केला..
आज विद्यार्थी भिंती समोर उभे राहून चित्र पाहून गिरवतात. तर काही विषय शोधत असतात...
  हे सर्व पाहून मनाला प्रचंड समाधान वाटते....

                      कलाशिक्षिका
              श्रीमती भारती वि. ठाकरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची व्हॅली..

सांधण व्हॅली नाईट ट्रेक⛰⛰ 3000 फूट उंचीची दरीत जाऊन बेस कॅम्पिंग..⛺⛺ या ट्रेक बद्दल जेव्हढे बोलावे तेव्हढे शब्द अपूर्णच ..या ट्रेकिंगचा ...